माऊली मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम “सर्व धर्म सम भाव” चा दिला संदेश

कणकवली हरकुळ बुद्रुक येथे काल दिनांक १२/०१/२०२३ रोजी “यकिनशहा बाबा ऊरूस” कार्यक्रमाचे निमित्ताने, माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे आधारस्तंभ अशोक काका करंबेळकर यांचे संकल्पनेतून संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली,
*यावेळी सल्लागार सुभाष उबाळे, प्रभाकर कदम, बाबुराव घाडिगावकर, सईद नाईक, प्रसाद उगवेकर यांच्या उपस्थितीत प्रथम मशीद मध्ये असलेल्या “यकिनशहा बाबा” यांच्या चरणी पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करण्यात आली,
*याप्रसंगी कमिटीचे अध्यक्ष शान्वाज खान यांना सेक्रेटरी अन्वर पटेल, आयोजित ऊरूस चे अध्यक्ष रियाज पटेल, हमीद पटेल ( वर्किंग प्रेसिडेंट ) यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले,
*यावेळी कमिटीचे अध्यक्ष, सर्व सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले, माऊली मित्र मंडळाचे व संलग्न मित्र मंडळांचे आभार मानले,
*राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, वयाच्या १८ व्या वर्षी पासून आमचे मित्र सुभाष उबाळे यांच्या सोबत येथील कमाल घोडेवाले, व त्यावेळी च्या मित्र मंडळींच्या निमंत्रणावरून आम्ही न चुकता आज पर्यंत येथे येऊन दर्शन घेत आहोत, त्यावेळी एका छोट्याशा जागेवर हि मस्जिद होती, पण आता भव्यदिव्य स्वरूप आणण्यामध्ये या सर्व मंडळींना श्रेय द्यावेच लागेल, आणि म्हणूनच हा सन्मान सोहळा आमच्या मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आला, ” सर्व धर्म सम भाव” हिच शिकवण सर्व धर्म शिकवतात, आपला भारत देश संपूर्ण जगतात या बाबतीत अग्रेसर आहे, आणि तो असाच अखंड रहावा अशी आम्ही भगवंताचे चरणी प्रार्थना करतो,
*प्रसाद पाताडे, अविनाश गावडे, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, भगवान कासले, लक्ष्मण महाडीक, जमिल कुरैशी, लवु जैताळकर, इत्यादी सर्व मंडळाचे पदाधिकारी व संलग्न मित्र मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते,
*पत्रकार मित्र रवि जाधव उपस्थितीत होते,
*डबलबारी किंग सुप्रसिद्ध बुवा अभिषेक शिरसाठ हेही उपस्थितीत होते,
*यावेळी कमिटीचे वतीने सर्व भाविक भक्तांना लंगर चे आयोजन करण्यात आले होते,
*आमने सामने कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,