खारेपाटण येथील युवा सामजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी कार्यकर्त्यांसह केला ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित हातात बांधले शिवबंधन…

खारेपाटण संभाजी नगर गुरववाडी येथील रहिवासी असलेले सद्या मुंबईत युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले श्री सतीश गुरव यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह आज बुधवारी मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अध्यक्ष श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित हातात शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी खारेपाटण ठाकरे शिवसेना विभाग युवा कार्यकर्ते श्री तेजस राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केलेले श्री सतीश गुरव यांच्यासह त्यांचे सहकारी कार्यकर्ते श्री निखिल गुरव,विक्रम गुरव,सुमित गुरव,चेतन गुरव,नितेश गुरव,दिनेश खांडेकर, दीपक गुरव,विश्वास गुरव,रोहन गुरव,तुषार चोरगे आदी एकूण १० कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर यावेळी प्रतिक्रिया देताना सतीश गुरव यांनी सांगितले की,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विचार तळागाळत पोहचवून मा.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणार असून शिवसेना पक्ष व शिवसैनिकांचे संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच पक्ष जी जबाबदारी आपल्यावर देईल ती प्रामाणिक पणे पार पडणार असल्याचे सांगितले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!