कणकवली पोलिसांकडून खारेपाटण येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न

कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी कॉलेज-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत केले मार्गदर्शन
शाळा-महाविद्यालयासोबत खारेपाटण बसस्थानक,बाजारपेठ,येथे जाऊन केले अंमली पदार्थ विरोधी जनजागृती
सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान राबविले जात आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण-तरुणी व नागरिक सापडत आहेत.याबाबतची जनजागृती करून त्याला आळा घालण्यासाठी कणकवली पोलीस ठाण्यामार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव व कणकवली पोलीस सहकाऱ्यांसोबत खारेपाटण येथे “अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली”काढून खारेपाटण येथील कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्र करून अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम काय आहेत त्याचा भविष्यावर आपल्या शरीरावर किती घातक परिणाम होतो याबाबत मार्गदर्शन केले व खारेपाटण शहरात ही अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.महाविद्यालय,शाळा, सार्वजनिक चौक,बस स्थानक, बाजारपेठ येथे जाऊन देखील अंमली पदार्थ सेवनाचे घातक परिणाम ,या अंमली पदार्थांमुळे धोक्यात येत असणारे तरुण युवा पिढी चे भविष्यव,व त्या मद्य धुंद अवस्थेमुळे वाढणारी गुन्हेगारी या सर्वच गंभीर विषयावर मार्गदर्शन करून कणकवली पोलीस यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली.खारेपाटण येथे पोलिसांमार्फत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅली मध्ये कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, पो.कॉस्टेबल-रंजित दबडे,राजकुमार आघाव,राजकुमार पाटील,सागर जाधव ,मकरंद माने ,खारेपाटण पोलीस दुरक्षेत्र अंमलदार पोलीस नाईक -उध्दव साबळे, पोलिस कॉस्टेबल-पराग मोहीते ,खारेपाटण गाव पोलीस पाटील -दिगंबर भालेकर,बेर्ले पोलीस पाटील- रतन राऊत तसेच खारेपाटण गावचे सरपंच प्राची इस्वलकर,सदस्य गुरुप्रसाद शिंदे,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते तसेच खारेपाटण विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सुद्धा या जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण