पळसंब येथे संकल्प विकास यात्रेचे उत्साहात स्वागत

आचरा
पळसंब येथे संकल्प विकास यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पळसंब चे सरपंच श्री.महेश वरक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,यावेळी पंचायत समिती कृषि विभाग चे विस्तार अधिकारी श्री.गोसावी साहेब उपस्थित होते,ग्रामसेवक श्री.अमित कांबळी यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले ,या कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार चित्र फित दाखवण्यात आली,त्यानंतर पुस्तिका वाटप,प्रतिज्ञा,मार्गदर्शन,ग्रामस्थांशी संवाद साधणे,लाभार्थी यांचे विचार मांडण्यास संधी देण्यात आली असा कार्यक्रम करण्यात आला यावेळी ,उपसरपंच श्री.अविराज परब,सदस्य सौ.राधिका कृष्णा तर्फे,ऋतुजा सावंत,स्मिता जुवेकर,आशा सेविका सौ.तनुजा परब,ग्रामसंघ अध्यक्ष सौ.किशोरी सावंत,श्री.राजू भोगटे,श्री.सुहास सावंत,श्री.सुहास सावंत,पोलीस पाटील श्री.सीताराम सकपाळ,श्री.मधुकर कदम,श्री.सुभाष तर्फे,श्री.मेघशाम जुवेकर,श्री.तुळशिदास चव्हाण ,गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते तसेच सर्व बचत गट अध्यक्ष व सचिव आणि सदस्य तयावेळी उपस्थित होते ग्रामसेवक यांनी सर्वांचे आभार मानून संकल्प विकास यात्रा या कार्यक्रमाची सांगता झाली