गणेश साईम यांची आयसीआयसीआय बँकेच्या अधिकारी पदावर नियुक्ती

कठोर मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवले यश

कठोर जिद्द व मेहनतीच्या जोरावर कणकवली मधील गणेश अशोक साईम यांची आयसीआयसीआय बँकेमध्ये उच्चपदस्थ अधिकारी पदावर निवड झाली आहे. कणकवली कॉलेजमधून बीएएफ ची पदवी प्राप्त केल्या नंतर आयसीआयसीआय बँकेची ऑनलाईन परीक्षा श्री. साईम यांनी दिली होती. चार महिने प्रशिक्षण झाल्यानंतर दोन महिने इंटरशिप पूर्ण केल्यावर त्यांची मुंबई शाखेच्या पवई येथील कार्यालयामध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. वडिलांचे छत्र लहानपणी हरवल्यानंतर कठोर जिद्द मेहनतीच्या जोरावर त्यांनी यश मिळवले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना गणेश साईम यांचे हे यश निश्चितच प्रेरणा देणारे आहे. बँक ऑफ इंडिया चे निवृत्त सहाय्यक महाप्रबंधक सच्चिदानंद राणे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!