स्वच्छतागृहाचे लोकार्पण झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार

आमदार नितेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली भाजी मार्केट मधील स्वच्छतागृहाचे आमदार राणेंच्या हस्ते लोकार्पण

कणकवली नगरपंचायतीकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रोत्साहन अनुदान अंतर्गत काणकवली नगरपंचायत जुने भाजी मार्केट येथे सुसज्ज व अद्यावत स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. भाजी मार्केट येथील स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. सदर सोहळ्याकरीता कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ व कणकवली नगरपंचायत कर्मचारी वृंद तसेच भाजी मार्केट मधील व्यापारी इत्यादी उपस्थित होते.
सदर स्वच्छतागृहा मध्ये तळमजल्यावर स्त्रीयांकरीता 2 इंडियन टाईप टॉयलेट. 1 वेस्टर्न टाईप टॉयलेट व बाथरूम व 2 बेसिन इत्यादीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पुरुषंकरीता 1 इंडियन टाईप टॉयलेट व बाथरूम 2 वेस्टर्न टाईप टॉयलेट व बाथरूम, 4 युरिनल व 2 बेसिन इत्यादीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींकरीता कॉमन टॉयलेट बाथरूम व बेसिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदरचे स्वच्छतागृह संस्थेला हे पे अॅण्ड युज तत्वावर देण्याचे नगरपंचायतीने ठरवले आहे. पहिल्या मजल्यावर लहान मुलांकरीता केअर सेंटर/सुविधा केंद्र सुरु करण्याबाबतच्या सूचना मा. आमदार महोदयांनी कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिल्या सदर शौचालय कणकवली शहराच्या मध्यभागी असल्याने नागरिकांची व भाजी मार्केट मधील व्यापा-यांची होणारी गैरसोय दूर होण्यास होणार आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!