कणकवलीची संस्कृती दाखवत, भव्य शोभायात्रेने पर्यटन महोत्सवास प्रारंभ

पटकीदेवी कडून शोभायात्रा महोत्सवस्थळी रवाना
स्थानिकांच्या कार्यक्रमासहित अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची आजपासून मेजवानी
कणकवली पर्यटन महोत्सवास भव्य शोभा यात्रेने आज सायंकाळी प्रारंभ झाला. कणकवली शहरातील 17 प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकण सहीत कणकवलीच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून करण्यात आले. बैलगाड्यांसह दशावतारी कला संस्कृती सुद्धा या शोभायात्रेतून दाखविण्यात आली. याच सोबत कोकणात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बुरुड कामाचा देखील चित्ररथ देखावा या शोभायात्रेत लक्षवेधी ठरत होता. कणकवली पटकीदेवी समोरून कणकवली महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या शुभारंभ पूर्वी शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर सिंधू गर्जना ढोल पथकाच्या निनादात पटकीदेवी कडून बाजारपेठ मार्गे सुरू झालेली ही शोभायात्रा पर्यटन महोत्सव स्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. कणकवली बाजारपेठ मधून शोभायात्रा महामार्ग वरून पर्यटन महोत्सव स्थळे स्थळी दाखल झाली. या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजीउपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी गटनेते संजय कामतेकर, माजी नगरसेवक, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत, शिशिर परुळेकर, आण्णा कोदे, महेश सावंत, किशोर राणे, आदी उपस्थित होते. भव्य शोभायात्रेने या महोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर कार्यक्रम स्थळी काही वेळातच ऑर्केस्ट्रा सुरू होणार असून त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली