तालुक्यातील एसटी फेऱ्या बंद प्रकरणी युवा सेना आक्रमक!

आगरप्रमुखांना घेराव घालत विचारला जाब
अखेर एसटी प्रशासन ताळ्यावर, न सोडलेल्या एसटी फेऱ्या लगेच सोडल्या
आज सकाळपासून तालुक्यातील एस टी सेवा विस्कळित झाली असून, या मुळे अनेक प्रवाशांना कणकवली बस स्थानकामध्ये ताटकळत राहावे लागले. अनेक गावांमध्ये नियोजित वेळेमध्ये बस फेऱ्या न सुटल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांनाही याचा त्रास सहन करावा लागला. ही बाब निदर्शनास येताच शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख प्रमुख उत्तम लोके यांच्या सह शिष्ट्यमंडळाने आगार प्रमुखांना घेराव घालत जाब विचारला. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर कणकवली आयनल, कणकवली कुंभवडे, कणकवली दारिस्ते ,बस सेवा तातडीने आगारातून सोडल्याची माहिती तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली. दरम्यान तालुक्यातील अनेक गावांमधील एसटीच्या फेऱ्या गेले काही दिवस अचानक रद्द करण्यात येत असून, ठाकरे गटाच्या दणक्या मुळे एसटी प्रशासन अखेर तळ्यावर आले आहे. ठाकरे गटाच्या आजच्या या आंदोलनामुळे जे विद्यार्थी आणि नागरिक बस ची वाट पाहत होते त्यांनी उत्तम लोके यांचे आभार मानले. त्यावेळी त्याच्या सोबत शिवसेना लोकसभा संघटक सचिन सावंत, युवासेना तालुका समन्वयक गुरुनाथ पेंडणेकर, युवासेना शाखा प्रमुख चेतन गुरव आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर/ कणकवली