मुक्तेश्वर आश्रमातील श्री निर्गुण पादुका महोत्सवाची सांगता

श्री संत पाचलेगावकर महाराज यांच्या मुक्तेश्वर आश्रमातील श्री निर्गुण पादुका महोत्सव नुकताच येथे दोन ते आठ जानेवारी या काळात मोठ्या भक्ती भावात साजरा झाला
संपूर्ण महाराष्ट्र मुंबई अगदी महाराष्ट्र बाहेरूनही भावी या सोहळ्याला उपस्थित होते या उत्सवात सहभागी झालेले मानवाधिकार संस्था चे संस्थापक श्रीकांत सावंत हे कोकणातून खास या महोत्सवात उपस्थित होते यावेळी संस्थानाच्या दररोज एक मूठ धान्य अर्पण करून त्यातून श्री सेवा यासारख्या उपक्रमांचे श्रीकांत सावंत यांनी कौतुक केले
या मुक्तेश्वर सोहळ्यानिमित्त वैद्यकीय शिबिरांसारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भव्य मिरवणूक सोहळा झाला सहभागी वारकऱ्यांनी श्रीराम महाराज खेडकर रमेश महाराज संतोष महाराज योगेश महाराज श्रीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पावली सादर केली,
खामगाव ( प्रतिनिधी)