बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेची सांगता

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग आणि जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमल बजावणी समिती सिंधुदुर्ग PIMC च्या वतीने संत गाडगेबाबा यांचा स्मृती दिन २० डिसे : ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन ०३ जानेवारी या पंधरा दिवसाच्या कालावधी बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेच्या निमित्त विविध शाळा , विद्यालये, गावे येथे जादूटोणा विरोधी कायदाचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन आयोजित केले होते . ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनादिवशी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपीड ता. देवगड येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक श्री विजय चौकेकर यांनी जादूटोणा विरोधी कायदाचे उपस्थित मुलांना पालकांना व शिक्षकांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले . यावेळी अश्विनी गर्जे मॅडम यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर मौलिक विचार मांडले . विजय चौकेकर यांनी जादूटोणा विरोधी कायदाची सविस्तर माहिती विविध प्रात्यशिकासह करून दाखविली . मुलांकडून, शिक्षकांकडून करून घेतली . मुलांचा मनातील भूत , भानामती, करणी ,मूठ मारणे आदी अंधश्रद्धेविषयक सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मतातील भिती दूर केली . यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक डी बी . करडे सर, शाळा व्यवस्थापन समिती चे चेअरमन किशोर भालचंद्र राणे , शिक्षिका अश्विनी सर्जेराव गर्जे ,ज्योती प्रकाश वाडकर , प्रीती संतोष जाधव , किरणकुमार मनोहर पाताडे ,निशिकांत हरी सुतार , साधना विश्वनाथ कदम ,प्रतिमा कदम , शेलार सर , अभाअनिसचे कणकवली संपर्क प्रमुख सिद्धार्थ तांबे , खजिनदार जयराम डामरे , सदस्य अनिल कदम आदी उपस्थित होते . त्यानंतर दुपारच्या सत्रात असलदे बौद्धवाडी ता . कणकवली येथील बौद्ध विहार येथे जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रात्याधिकासह मार्गदर्शन करण्यात आले . तेथील उपस्थित महिला व समाज बांधवांना विविध प्रात्यसिकासह मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी पंचशिल महिला मंडळाच्या अध्यक्षा सचिव व सर्व सदस्या उपस्थित होत्या .





