सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन संपन्न

सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर यांचा 10वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.दि 3जाने2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी सखी महिला मंडळ गटाला 10 वर्ष पूर्ण झाली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा सौ.स्वप्नाली कांबळे व जेष्ठ नागरिक व मंडळाच्या सदस्या शुभांगी गुरव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कार्याध्यक्षा स्वप्नाली कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.या सखी महिला मंडळाच्या सदस्या अनुजा ठाकुरदेसाई यांनी ब्युटीपार्लर चा शुभारंभ केल्याने त्यांनी देखील महिलांना आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी राखावी यावर मार्गदर्शन केले.सखी महिला मंडळ नेहमीच सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपली उल्लेखनीय कामगिरी करत आहे.या मंडळाचा फुगडी संघ तर जिल्हा आणि जिल्हाबाहेर देखील प्रसिद्ध आहे या गटाने फुगडी स्पर्धेत अनेक तालुका,जिल्हा, राज्य पातळीची पारितोषिके प्राप्त केली आहेत आणि आपल्या सखी महिला मंडळाचे नाव जिल्ह्या आणि जिल्ह्याबाहेर देखील प्रसिद्ध केले आहे.तसेच या सखी महिला मंडळामार्फत चित्रांगण ,अनाथाश्रम ला भेट ,वनभोजन ,हळदी कुंकू, असे विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात.10 वर्षपूर्ती निमित्ताने या महिला मंडळाला अनेक स्तरातून शुभेच्छा चा वर्षाव झाला आणि 10 वर्षात या मंडळाने केलेल्या उत्तमोत्तम कामगिरी बद्दल त्यांचे कौतुक देखील करण्यात आले.सखी महिला मंडळ खारेपाटण रामेश्वर नगर च्या 10 व्या वर्धापनदिन निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्ष-प्रणाली कुबल,सचिव-अंजली कुबल,सदस्या -शुभांगी गुरव ,रंजना ब्रह्मदंडे, ज्योती माने,आरती वरूनकर, मृदुला ठाकूरदेसाई,अमृता कुबल, जान्हवी सुतार,नेहल कांबळे, आदी महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या सर्व महिला वर्गाचे स्वागत तसेच सूत्रसंचालन मंडळाच्या सचिव-अंजली कुबल यांनी केले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!