नागवे येथील दत्तात्रय ढवण यांचे निधन

कणकवली तालुक्यातील नागवे तांबळवाडी येथील रहिवाशी तथा मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त लिपिक श्री.दत्तात्रय काशिराम ढवण वय(७७) यांचे सोमवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.ते मनमिळावू आणि परोपकारी स्वभावामुळे परिचित होते.नागवे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात,पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी,दोन स्नूषा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.सुप्रसिद्ध उद्योजक दिलीप ढवण यांचे ते वडील होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!