सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका आंबा ,काजू पिकावर….

देशाच्या प्रत्येक भागात थंडीची पातळी सातत्याने वाढत आहे. धुके आणि थंडी पडत असतानाच आता राज्यात पावसाने देखील हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. आज देखील कुडाळ तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने रात्री 10 च्या सुमारास सुरवात केली
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू या पिकावर मोहोर आल्याचे दिसून येत आहे. या पावसाचा फटका या फळपिकावर बसण्याची शक्यता आहे.





