बिबट्याचा फासकीत मृत्यु, एकावर गुन्हा दाखल

कणकवली तालुक्यातील साळिस्ते गावातील घटना
कणकवली साळिस्ते येथे फासकीमध्ये वन्यप्राणी बिबट्या अडकल्या बाबत वनपाल सामाजिक वनिकरण तळेरे यांनी वनपाल फोंडा यांना दुरध्वनीवरुन खबर दिल्यावरुन वनक्षेत्रपाल कणकवली, वनपाल फोंडा, देवगड, दिगवळे आदी कर्मचाऱ्या सोबत साळिस्ते कणकवली येथे जावून फासकीत अडकलेल्या वन्यप्राणी बिबट्या बाबत माहिती घेवुन सदर फासकीत अडकून मृत झालेल्या मृत वन्यप्राणी बिबट्याचे शव ताब्यात घेतले.
विलास वरे यांच्या मालकीच्या आंबा बागेच्या क्षेत्राचे संरक्षणाचे काम करणारे मजुर अनिल आत्माराम कणेरे रा. साळिस्ते यांनी आंबा बागेच्या कुंपणास फासकी लावली होती. त्या फासकीत पहटेच्या वेळी अंदाजे 10 वर्ष वयाचा वन्यप्राणी बिबट्या अडकून मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी वनविभागास माहिती दिली. त्यानुसार उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्या सहाय्यक वनसंरक्षक (खाकुतो व वन्यजीव) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मृत वन्यप्राणी बिबट्यास ताब्यात घेवुन पशुधन विकास अधिकारी खारेपाटण श्री. रविंद्र दळवी व पशुधन विकास अधिकारी जानवली श्री. स्वप्नील अंबी यांचेकडून शवविच्छेदन करुन त्याचे वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या आवारात दहन करण्यात आले. या बाबत अनिल आत्माराम कणेरे रा.साळिस्ते यांनी आंबा बागेत असणा-या कुंपणाला वन्यप्राण्याच्या शिकार करण्याच्या उद्देशाने लावलेल्या फासकीत वन्यप्राणी बिबट्या अडकुन मृत पावल्याने व सदरचा गुन्हा श्री. कणेरे यांनी कबुल केल्याने त्यांच्यावर वन्यप्राणी बिबट्याच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने त्यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,51 व 52 अन्वये गुन्हा नोंद करणेत आला. वरील वनगुन्ह्याबाबत उपवनसंरक्षक सावंतवाडी नवाकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (खा. कु.तो.व वन्यजीव) सावंतवाडी डॉ. सुनिल लाड वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. राजेंद्र घुणकीकर, वनपरिमंडळ अधिकारी फोंडाघाट धुळु कोळेकर, वनपाल देवगड सारीक फकीर, वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील, वनपाल मालवण श्रीकृष्ण परिट व वनरक्षक श्री. अतुल पाटील, रामदास घुगे, सुखदेव गळवे, सिध्दार्थ शिंदे, प्रतिराज शिंदे, अतुल खोत व वनसेवक दिपक बागवे, चंद्रकांत लाड व मौजे-साळिस्ते पोलिस पाटिल गोपाळ चव्हाण व ग्रामस्थ मोहन भोगले व इतर यांच्या उपस्थीतीत कार्यवाही केली. तरी कोणत्याही गावात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फासकी लावल्याचे निदर्शनास आल्यास तसे वनविभागाला तात्काळ कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे. कोणत्याही क्षेत्रात वन्यप्राण्याच्या शिकारीसाठी फासकी लावल्याचे निदर्शनास आल्यास संबधीतावर वनविभागाच्या वतीने कायदेशीर कारवाइ करण्यात येईल असे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले असुन त्याबाबत माहिती देणा-याचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल. अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी





