सोनाक्षी कला सेवा संस्थान महाराष्ट्र राज्य आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

दिनांक, ०७/०१/२०२४ रोजी सोनाक्षी कला सेवा संस्थान महाराष्ट्र राज्य आयोजित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात श्रीमती अरूंधती भालेराव संचालिका प्रारंभ कला अकादमी , फिल्म सेन्सॉर बोर्ड मेंबर दिल्ली , सुकाणु समिती शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य तसेच श्रीमती मेघा राम पाटील व श्रीमती मीनाताई ठाकरे सामाजिक सेविका महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत मला सेंद्रिय शेतीतील प्रचार व प्रसारासाठी तसेच सेंद्रिय शेती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव करण्यात आला.





