आजगाव ग्रामपंचायत कडून सावित्री बाई यांची जयंती

आजगव ( तालुका सावंतवाडी)
आजगाव ग्रामपंचायत येथे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती “उत्साहात साजरी करण्यात आली ,या वेळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख वकील नीता सावंत ,नगरसेविका स्वप्ना नाटेकर ,सर्कल कोदे ,नागराज तसेच आजगाव सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,आरोग्य सेविका ,आशा ताई उपस्थित होते .ग्राम पंचायत आजगाव तर्फे आजगाव आरोग्य केंद्रास औषधे व आरोग्यसेवा साहित्य देण्यात आले ,याचे वितरण तहसिलदार नीता सावंत व सौ स्वप्ना नाटेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले





