राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष .श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले .यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री देव नारायण विद्यामंदिर आसोली नं.१ चे मुख्याध्यापक श्री प्रफुल्ल ठोकरे यांना प्रदान

राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग मार्फत देण्यात आला पुरस्कार

वेंगुर्ला : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री देव नारायण विद्यामंदिर आसोली नं.1 शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला.

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने आसोली शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रफुल्ल ठोकरे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली तळमळता बघून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी कु.हितेश सुरेश कांबळी याला आदर्श विद्यार्थी तर कु. इंदु वसंत गावडे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष संतोष तळवणेकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व राष्ट्रीय छावा संघटना यांच्या कडून सन्मानपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री संतोष तळवणेकर सर,श्री कल्याण कदम सर, श्री पारधी सर, आसोली ग्रामपंचायत सरपंच बाळा जाधव, आसोली विकास मंडळ मुंबई अध्यक्ष अशोक धुरी, विजय धुरी, सुरेश धुरी,श्री प्रकाश परब कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पोळजी हे होते.

कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते श्री रुपेश पाटील हे होते ,विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले

कार्यक्रम अध्यक्ष – श्री. निलेश पोळजी प्रमुख पाहुणे – श्री. संतोष तळवणेकर( अध्यक्ष राजे प्रतिष्ठान कामगार सेना)प्रमुख वक्ते – श्री रुपेश पाटील ,श्री. कल्याण कदम सर ( माजी उच्च श्रेणी मुख्याध्यापक, उपाध्यक्ष छावां संघटना)श्री. ज्ञानेश्वर पारधी ( राजे प्रतिष्ठान कामगार संघटना, खजिनदार), पत्रकार साबाजी परब
श्री. बाळा जाधव ( सरपंच आसोली)
श्री. अशोक धुरी ( अध्यक्ष – मुंबई विकास मंडळ आसोली)श्री. सुरेश धुरी ( उपाध्यक्ष – मुंबई विकास मंडळ आसोली)श्री. प्रकाश परब ( आसोली विकास मंडळ)श्री. विजय धुरी ( आसोली ग्राम विकास मंडळ)
श्री. विनोद गावडे (उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ) श्रीम. संपदा नाईक (उपाध्यक्ष माता पालक संघ),श्री. प्रितेश किनळेकर,श्री प्रफुल्ल ठाकरे (मुख्याध्यापक),श्रीम. सुचिता गावडे (उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती),श्री अमोल आग्रे (उपशिक्षक शाळा राजधूरी),श्रीम. सुजाता देसाई,श्री राजेंद्र धुरी,श्री प्रसाद गावडे उपशिक्षक आसोली फणसखोल, ,श्री ईश्वर थडके आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / वेंगुर्ला

error: Content is protected !!