युवासेनेच्या वतीने कनेडी येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

शिबिराचा लाभ घेण्याचे उत्तम लोके यांचे आवाहन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार २१ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात आले आहे. अशी माहिती युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिली. केवळ आरोग्य संदर्भातील समस्या मांडून न थांबता आरोग्य च्या अनुषंगाने जनतेला सुविधा पुरवण्यासाठी देखील युवा सेना सामाजिक कामात सक्रिय आहे अशी माहिती श्री लोके यांनी दिली.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!