पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्या वेळी केलेल्या कामाच्या निविदा व अंदाजपत्रकांची कागदपत्रे द्या!

अन्यथा पुन्हा कार्यालयात आल्यावर कागदपत्र घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही
माजी आमदार परशुराम उपरकर व मनसे शिष्टमंडळाचा कार्यकारी अभियंता यांना इशारा
अंदाजपत्रकांची माहिती गुरुवारपर्यंत देण्याचे आश्वासन
४ डिसेंबर २०२३ रोजी मालवण येथे झालेला नौसेना दिनाकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे बांधकाम दुरूस्ती हेलीपॅड बांधणे, चबुतरा बांधणे व इतर कामांची कामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये निविदा क्र.३४ मधील तंत्रनिकेतन कॉलेज येथे तात्पुरते हेलीकॉप्टरसाठी हेलीपॅड तयार करणे ९३ लाख ७६ हजार ५९२ रूपये निधी खर्च केलेला आहे त्या कामांचे अंदाजपत्रक अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर व मनसे च्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आजयकुमार सर्वगोड यांच्याकडे केली आहे. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बोर्डींग मैदान येथे तात्पुरते हेलिपॅड ७८ लाख ८७ हजार १३२रूपये यांचे अंदाजपत्रक मिळावे.
ओझर येथे हेलिपॅड करणे ५५ लाख ७४ हजार ४९१ रूपये यांचे अंदाजपत्रक मिळावे., २५ किमी लांबीचे विविध रस्त्यांचे मालवण तालुक्यात डांबरीकरण केले त्या रस्त्यांचे अंदाजपत्रक मिळावे., १०० किमी लांबीचा रस्ता सुस्थितीत करणे या कामांचे अंदाजपत्रक तसेच रस्त्यावर पांढरे पट्टे कॅटाआईज बोर्ड लावून सुरक्षित करणे या कामांचे अंदाजपत्रक मिळावे., पुतळा करण्यात आला त्यांचे अंदाजपत्रक मिळावे., चबुतरा तयार करण्यात आला त्याचे अंदाजपत्रक मिळावे.,आर्किटेक नेमण्याकरीता केलेले अंदाजपत्रक व निविदांची सविस्तर माहिती. व काम देण्यात आले त्या आर्किटेकचे नाव. कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हिडीओ शुटींग, ड्रोन शुटींग व फोटोग्राफी यासाठी काढलेल्या निविदांची संपुर्ण माहिती व त्याचे अंदाजपत्रक व काम देण्यात आले त्याचे नाव व इतर कामे सा.बा. विभागांना नौसेना दिनासाठी केली त्याची अंदाजपत्रकावरील अंदाजपत्रकांची छायाकितप्रत मिळावी. वृत्तपत्राच्या बातमीमध्ये चबुतराचे काम दोन महिने सुरू होते. म्हणजेच अडीच महिन्यापासून सा.बा. विभागाचे नियोजन झाले होते. आपण काही निविदा न काढता काही कामे केल्याचे वृत्तपत्रात छापून आलेले आहे. व तश्या प्रकारची माहिती घेतली असता माहिती मिळालेली आहे.आपण हेलिपॅड बांधण्यासाठी सुमारे सव्वा दोन कोटींची कामे निविदा क्र.३४ ने दि.३०/११/२०२३ रोजी प्रसिद्धी केली १ दिवसाचा अवधी ठेवून दि.०१/१२/२०२३ रोजीला अर्ज दिले व दुसन्या दिवशी दि. ०२/१२/२०२३ रोजी निविदा फोडल्या एवढया घाईगडबडीत निविदा फोडून निविदा होण्यापूर्वी कामे पुर्त होण्याची चर्चा मालवण नागरीकांमध्ये आहे.सदर पुर्ण झालेली हेलिपॅडवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता हेलिपॅड हे यामधील पॉलिटेक्निक कॉलेजकडे बांधण्यात आलेले ५ व ओझर येथे उभारलेले २ हेलिपॅड हा कातळावर हॉटमिक्सचा माल टाकून पांढरे कलर मारलेले आहेत. त्याची किंमत निविदे एवढया रक्कमेची होणार नसल्याची आमची धारणा आहे. आपले शाखा अभियंता व आमचे तांत्रिक अभियंता यांचे समवेत पाहणी करून त्याचे मुल्यांकन करूया यावरती मी स्वत: प्रत्यक्ष जागेवर येण्यास तयार आहे.. त्यामुळे नौसेना दिनाच्या अनुशंगाने आपण केलेल्या कामांची सर्व अंदाजपत्रके आज मिळण्याकरीता आपणाकडे आलेलो आहोत. त्याच अंदाज पत्रकांच्या छायांकित प्रतेसाठी होणारी रक्कम आम्ही भरत आहोत. आम्हास अंदाजपत्रके मिळण्यापर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही याची नोंद घ्यावी. असा इशारा यावेळी देण्यात आला आहे यावेळी विनोद तांडव अमित इब्रामपूरकर, संदीप लाड व इतर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यावेळी अजय कुमार सर्व गोडी यांनी अंदाजपत्रकाची माहिती गुरुवारपर्यंत देण्याचे मान्य केले. जानेवारीच्या पुढील आठवड्यात जागेवर जाऊन पाहणी करण्याचे मान्य केले व पूलाच्या बाबत उत्तर देऊन माहिती देतो असे आश्वासन दिले की माहिती श्री उपरकर यांनी दिली.
दिगंबर वालावलकर/ कणकवली