सिंधुदुर्ग हिंदी शिक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. सुमंत दळवी यांची बिनविरोध निवड.

कणकवली/मयुर ठाकूर

सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17/12 /2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी ओरोस या ठिकाणी संपन्न झाली. 2023 ते 2026 या तीन वर्षाच्या कालावधी साठी कनेडी हायस्कूल चे मुख्याध्यापक / प्राचार्य महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती मंडळ पुणे सदस्य तसेच मंडळाचे सचिव श्री. सुमंत दळवी यांची सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. श्री देवी यक्षिणी विद्यालय बेणगाव माणगाव चे सहा. शिक्षक श्री. सदाशिव सावंत यांची सचिव पदी, वसोली हायस्कूल चे सहा. शिक्षक श्री. दीपक तारी, वेंगुर्ला हायस्कूल च्या सहा. शिक्षिका सौ. विमल शिंगाडे यांची उपाध्यक्ष पदी, सहसचिव म्हणून श्री. बा. म. वाजंत्री, जितेंद्र महाभोज, कोषाध्यक्ष म्हणून श्री परशुराम नार्वेकर, कार्याध्यक्ष श्री. कैलास जाधव, उप कार्याध्यक्ष श्री पंडित माने, कार्यकारी सदस्य म्हणून सौ आसावरी कदम, सौ. स्नेहल तांबे, श्री संजय जाधव, श्री. अमर पवार, शिरीष नाईक, संभाजी कांबळे, स्वीकृत सदस्य म्हणून श्री सुरेश पाटील, श्री. रामप्रसाद गोसावी, निमंत्रित सदस्य म्हणून श्री. अरुण तेरसे, सल्लागार म्हणून सौ. आश्लेषा पारकर, श्री. पी. व्ही. कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

error: Content is protected !!