साकेडीत हातभट्टी च्या दारूवर “एलसीबी” ची धाड

तब्बल 7 हजार रुपयांची गावठी गुळाची दारू जप्त
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
अवैधरित्या गावठी गुळाच्या हातभट्टीची दारू सापडल्या प्रकरणी साकडी बोरीचीवाडी येथील बितोज जुवाव म्हपसेकर (70, साकेडी, बोरीचीवाडी) हिच्या घरा जवळ स्थानिक गुन्हा अन्वेषण ने टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 लिटर 7 हजार रुपये किमतीची गावठी गुळाची हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचत आज मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपीच्या घराच्या मागील बाजू छापा मारला. यावेळी लाकडाच्या माचाच्या बाजूला ही दारू लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, हवालदार किरण देसाई, पोलीस नाईक अमित तेली, महिला पोलीस स्वाती सावंत आदींच्या पथकाने केली.
कणकवली/ प्रतिनिधी