विनायक राऊत यांनी घेतली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट

रायगड जिल्ह्यातील वडखळ ते माणगाव आणि रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या दुरावस्थेबाबत खासदार – शिवसेना नेते मा.श्री.विनायक राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना.श्री.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.