महाराष्ट्र काॅग्रेस नेत्यांचा एकजूटीने सरकार वर हल्ला बोल

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय सरकारला विधान सभेतून पळ काढता येणार नाही.

नागपूर इथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ‘हल्ला बोल’ मोर्चा काढून महायुती सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांना मदत करण्याची या सरकारची ऐपत नाही. शासन आपल्या दारीच्या नावाखाली करोडो रुपये खर्च केले जातात, पण शेतकऱ्यांना मात्र सरकार मदत करत नाही.

शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही.

तुम्ही तीन राज्य जिंकले असाल पण आज या मोर्चातील उपस्थिती तुम्हाला महाराष्ट्रातून हाकलून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे सरकार तीन तीघडा काम बिघाड आहे. पहिले अलिबाबा चाळीस चोर होते आता दोन अलिबाबा ८० चोर आहेत आणि ते महाराष्ट्र लुटायला निघाले म्हणून आज हल्लाबोल आम्ही करत आहोत.

नागपूर इथे झालेल्या मोर्च्यात व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले,विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, सुनील केदार, माणिकराव ठाकरे , वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यात बळीराजा प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे. ट्रिपल इंजिन सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकार झोपले आहे. गेले तीन दिवस विरोधक धान, कापूस, सोयाबीन, संत्रा, द्राक्ष, कांदा प्रश्न उपस्थित करत आहेत. शेतकरी या अधिवेशनाकडे आशा लावून बघत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्याशिवाय विधान सभेतून पळ काढता येणार नाही. काॅग्रेस पक्षाच्या उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी अशा प्रकारे सरकारचे वाभाडे काढत खोके सरकारच्या एकंदरीत कारभारावर प्रश्न चिन्हे उभी केली.

error: Content is protected !!