खेळच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात श्री.चंद्रकांत माईंणकर

आयडियल प्रशालेत स्पोर्ट डे चे आज उदघाट्न.
कणकवली/मयुर ठाकूर.
खेळाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे तेच माणसाला निरोगी व तंदुरुस्त ठेवतात असे उदगार आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक श्री.चंद्रकांत माईंणकर यांनी व्यक्त केले ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे च्या वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते त्यांच्या शुभ हस्ते व ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला विद्यार्थ्यांचे संचलन, त्यानंतर मैदान क्रीडा ज्योत मान्यवरांच्या हस्ते
प्रज्वलित करून ती विद्यार्थ्यांकडून फिरविली गेली त्यानंतर या उद्घाटनाच्या निमित्ताने योगाडान्स,लेझीम,
ॲरोबिक आणि ट्रूप डान्स नी अधिकच रंगत आणली या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक चंद्रकांत माईणकर ,ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे , सल्लागार तानावडे सर,सदस्य यज्ञेश शिर्के सर, पी टी ए मेंबर अस्मि सावंत मॅडम, सृष्टी शिर्के मॅडम आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात अनेक वैयक्तिक व सांघिक खेळ खेळले जाणार आहेत