डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी युरेकाच्या 26 विद्यार्थ्यांची निवड

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत लेखी, प्रात्यक्षिक, प्रकल्प व मुलाखत या चार टप्प्यात घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक लेखी परीक्षा निकाल जाहीर झाला असून युरेका एज्युकेशन च्या इयत्ता सहावी तील 26 व नववीतील 4 विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे .प्रात्यक्षिक नववी करिता 7 जानेवारी व सहावी साठी 21 जानेवारी रोजी बाल शिक्षण इंग्लिश स्कूल मयूर कॉलनी कोथरूड पुणे या ठिकाणी होणार आहे यातून दहा टक्के विद्यार्थी प्रकल्प व मुलाखत या टप्प्यासाठी निवडले जातील.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुलानी उत्तुंग यश मिळवले.
कुणाल गौंडळकर, सर्वज्ञा गोठणकर, वेदक खोचरे, दुर्वांक गावडे, देवश्री कानसे, गौरेश तायशेटे, शिवा देवसरकर सर्वज्ञा गोठणकर वरद ठाकूर, मैत्री हिर्लेकर सई इनामदार, पार्थ वझे शारव नांगृत, मुग्धा टोपले, विजय मटकर, शुभंकर पाटकर ,योगेश परुळेकर आदित्य प्रभूगावकर, वेद वाळके ,अर्चित पाटील, स्वराज नाईक ,नवनीत परब नक्षत्रा काळे, सोहम इनामदार, वैस्रवन राणे, तर नागपूर विभागातून उत्कर्ष पवार, आर्यन देशमुख, आरव कांबळे यांची पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे
2008 पासून आत्तापर्यंत डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत युरेका सायन्स क्लब च्या सुषमा केणी यांच्या मार्गदर्शना खाली एकूण 77 पदके प्राप्त केली आहेत यामध्ये 9 सुवर्ण, 56 रजत ,12 कास्यपदक चा समावेश आहे.
युरेका सायन्स क्लबच्या प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकाचे कणकवली येथे सहावी व नववीच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांकरीता ऑफलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे युरेका सायन्स क्लब चे सदस्य सुषमा केणी, शितल वाळके ,भूषण पांगम, यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे अधिक माहिती करिता 9284035326 या क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन करण्यात येत आहे
कणकवली(प्रतिनिधी)





