दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीच्या जयघोषात सोनुर्ली नगरी दुमदुमली

लाखों भाविक श्री देवी माऊली चरणी नतमस्तक
दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. सकाळीं धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर देवीच्या दर्शनाला सुरुवात करण्यात आली.
श्री देवी माऊलीची मूर्ती सुबक व आकर्षक आहे. जत्रोत्सवानिमित्त सोन्याचांदीच्या दागिन्यांनी तिला सजविण्यात येते . श्री देवी माऊलीची मुर्ती सुबक सजविण्यात आली होती. वस्त्रलंकारा घालून मुर्ती सजविण्यात आली होती.हे सुवर्णालंकारांनी नटलेले मनोहारी रूप पाहण्यासाठी लाखो भाविक यांनी गर्दी केली होती. देवस्थानं कमिटी, पोलीस यंत्रणा,सर्व शासकीय यंत्रणा हा उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जत्रोत्सवाला लाखो भाविकांची गर्दी असली तरी अतिशय शांततामय वातावरणात हा सोहळा सुरु आहे. अगाध महिमा असलेल्या माऊली देवीचे मंदिर नव्याने भवदिव्य उभारण्यात आले आहे. . सोनुर्ली जत्रोत्सवाला लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता. मोठ्या स्वरूपात खरेदी-विक्री झाली. एसटी महामंडळाच्या बसेस आणि खासगी वाहनांतून लाखो भाविक गर्दी केली होती. जत्रोत्सवाचे विलक्षण दृष्य पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. देवीच्या मंदिराचा झगमगाट, लोटांगणाचा उत्सव आणि देवीचे सुखमय दर्शन डोळ्यात साठवून भाविक भारावून गेले. यावर्षी या जत्रोत्सवाला मोठ्या प्रमाणात भक्तगणांची गर्दी केली होती.
सावंतवाडी प्रतिनिधि