3 डिसेंबर रोजी कणकवलीत दिव्यांग बांधवांचा स्नेह मेळावा
चित्रकला व गायन स्पर्धेचे करण्यात आले आहे आयोजन
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता गोपुरी आश्रम वागदे ता.कणकवली या ठिकाणी दिव्यांग बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी उपवर दिव्यांग बांधवांची वधुवर नोंदणी करण्यात येणार आहे. इच्छुक दिव्यांग बांधव व भगिनींनी एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीचे अध्यक्ष श्री.सुनिल सावंत मोबा.नंबर 9420654624 व सचिव श्री.सचिन सादये मोबा.नंबर 9860718949 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या सोहळ्यानिमित्त दिव्यांग मुलांसाठी (लहान गट) चित्रकला स्पर्धा व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेसाठी कागद ,रंग,पट्टी व पेन्सिल संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.चित्रकला व गायन स्पर्धेसाठी पहिले १ ते ३ क्रमांक काढले जावून त्यांना बक्षिसे दिली जातील.
तसेच यावेळी दिव्यांग बांधवांना रोजगार निर्माण होण्यासाठी रोजगार संदर्भात मार्गदर्शन ही करण्यात येणार आहे.
तरी कणकवली तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी या सोहळ्यास उपस्थित राहून या सोहळा यशस्वी करण्यात यावा असे आवाहन एकता दिव्यांग विकास संस्था कणकवलीचे अध्यक्ष श्री.सुनिल सावंत यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी