२८ फेब्रुवारी रोजी कणकवलीत होणार वाद्यांचा जागतिक विक्रम

आयडियल आणि सोमास्थ अकॅडमी तर्फे आगळे वेगळे आयोजन

जागतिक विक्रमाचे साक्षीदार होण्याची जिल्हा वासियांना सुवर्णसंधी

कणकवली : ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून दी.२८ फेब्रुवारी २०२३ रोजी आयडीयल इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या पटांगणावर एक भव्यदिव्य विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार तसेच वाद्यामध्ये ( ढोल, ताशा, तबला , पेटी, ढोलक, मृदुंग, टाळ, हलगी, दिमडी, ई. वाद्यांचा समावेश आहे.) व त्याचबरोबर उर्वरित विद्यार्थी डॉ. ए.पी. जे.अब्दुल कलाम यांची मानवी प्रतिकृती तयार करून एक विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत.या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होईल व त्यामध्ये सहभागी होणारे शालेय विद्यार्थी , शिक्षक व पालकवर्ग यांना (स्पर्धकांना ) वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र दिले जाईल.तरी या उपक्रमात प्रशालेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवावा असे आवाहन आयडियल इंग्लिश स्कूल आणि सोमास्थ अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी प्रत्येकी २०० रुपये फी आकारली जाईल. सहभागासाठी वर्गशिक्षक किंवा खालील नंबरवर संपर्क साधावा.
८६०५०५५०७६,७६६६४९५८७०
९०८२६६९८११,८००७८५०५९३
७०५७२९२९८५,९३५९१९३६५९
नावनोंदणीसाठी अंतिम तारीख 20/02/2023 राहील.

सीतराज परब / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!