पंतप्रधान ज्या जिल्ह्यात जातात त्या जिल्ह्याचे महत्त्व वाढते

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

ठाकरेंवर खळ्यात बसण्याची वेळ का आली त्याचा विचार करावा

नौसेना सोहळ्याच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी मालवण सिंधुदुर्ग किल्ला येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी केली जात आहे या पुतळ्याचे ते अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यावेळी नौसेना दल आणि जनतेला पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहे. त्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा नौसेना दल आणि राज्य सरकार यांनी आखलेली आहे. तो कार्यक्रम कसा असेल याची संपूर्ण माहिती संबंधित अधिकारी आपल्याला देतीलच, मात्र हा नौसेना दिन मोठ्या उत्साहात व्हावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत मोठ्या थाटात व जल्लोषात व्हावे,यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री तथा भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पडवे मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला दौरा जो सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.पूर्व तयारीला लागलो आहेत. पंतप्रधान एखाद्या जिल्ह्यात जातात त्यावेळी त्या जिल्ह्याचे महत्त्व वाढते. त्यामुळे फायदा तोट्याचा हिशोब घालायचा नसतो होईल तो चांगलाच फायदा जिल्ह्याला होणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र त्याच बरोबर अनेक उद्योग येत आहेत. लघु,मध्यम स्वरपाच्या उद्योगाला चालना मिळत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळात भुजबळ आहेत त्यांना काय वाटत या वर बोलण्या पेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा आरक्षणावर मी अध्यक्ष असताना सर्व्हे केला. त्यातील 34 टक्के मराठा समाजापैकी पैकी 16 टक्के मराठा आरक्षणासाठी पात्र आहे ते 16 टक्के आरक्षण दिले जावे अशी आमची मागणी आहे.मराठा समाज कधी कोणाला घाबरलेला नाही.
डीएड बेरोजगार विद्यार्थी जे पास झालेले आहेत त्यांना सेवेत सामावून घ्या. रत्नागिरी जसे केले आहे त्या प्रमाणे नियुक्ती करा अशी मागणी आहे त्या साठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांची एकत्रित भेट घेवून निर्णय करणार असेही केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
आरोग्य यंत्रणा आणि शासकीय महाविद्यालय मध्ये सेवा कमकुवत असेल तर आमच्या रुग्णालयात मोफत सेवा देवू. कोरोना काळात सुद्धा तशी सेवा आम्ही दिली होती.
आदित्य ठाकरे कोण आहे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.16 आमदारांचे 160 आमदार करायला जादूची कांडी आहे काय ? त्यांना होते ते टिकवता आले नाहीत.ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत गेले.
जाहीर सभा घेवू शकत नाही ते आज खळ्यात आले. हा आदित्य खळा बैठका घेण्यास सुद्धा बाहेर राहील याची खात्री नाही.तो जेल मध्ये असेल.आणि त्याच्या सोबत संजय राऊत सुद्धा असेल.आज मुंबईचे जे प्रदूषण बिघडले आहे त्याला हेच लोक जबाबदार आहेत त्यांची सत्ता इतकी वर्ष त्या मुंबईवर होती मात्र प्रदूषण नियंत्रण करण्याचे काही केले नाही असा टोला. केंद्रीय मंत्री राणे यांनी लगावला. अडीच वर्ष सत्ते वर होते. अडीच दिवस सुद्धा मंत्रालयात गेले नाहीत.खळ्यात बसण्याची वेळ का आली याचा विचार करा.त्यांचीच कर्म आहेत ही. आमदारांना भेट पण द्यायचे नाहीत. बंगल्यात जावून सुद्धा भेट दिली नाही.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

error: Content is protected !!