आमदार नितेश राणेंनी घेतली तेलंगणामध्ये अमित शहा यांची भेट

तेलंगणा मध्ये भाजपाच्या प्रचारासाठी गेले आहेत आमदार नितेश राणे
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या भाजपाच्या प्रचारासाठी गेलेल्या आमदार नितेश राणे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी नितेश राणे हे गेले काही दिवस तिथे प्रचारात सक्रिय आहेत. यावेळी त्यांच्यासोबत तेथिल स्थानिक भाजपाचे नेते उपस्थित होते.
कणकवली प्रतिनिधी