आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलचे नेत्रदीपक यश

पहिली ते बारावीतील १७९ विद्यार्थी सहभागी

विद्याथ्यांनी केली ७ सुवर्ण, १६ रजत आणि ३ कास्य पदकांची कमाई

प्रतिनिधी । कुडाळ : हिंदी विकास संस्थान दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाड -2023 चा निकाल जाहिर झाला असून सदर परीक्षांमध्ये कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले
प्रथमच घेण्यात आलेल्या या परीक्षेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या 179 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नेत्रदीपक यश संपादन केले. सर्व विद्यार्थी उत्तम यश संपादन करत उत्तीर्ण झाले.7 विद्यार्थीना सुवर्ण,16 विद्यार्थ्यांना रजतआणि 3 विद्यार्थीना कांस्य पदक मिळाले आहे.
इयत्त्ता ३री मधील सिया लक्ष्मण देसाई या विद्यार्थिनीला सुवर्ण पदक व राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सम्मान पुरस्कार तसेेच इयत्ता ६ वी मधील भार्गवी सुनील सडवेलकर या विद्यार्थिनीला सुवर्ण पदक व हिंदी बालश्रेष्ठ सम्मान या पुरस्काराने गौरवण्यात आले. या विद्यार्थीना गुणगौरव सोहळ्यासाठी 29 नोव्हेंबरला दिल्ली येथे बोलवण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी उत्तम यश संपादन करत उत्तीर्ण झाले.
सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर तसेच सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे व उपमुख्याध्यापिका विभा वझे, विषय शिक्षिका प्राजक्ता जाधव व माधवी मालगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांना संस्था व प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या परीक्षांच्या आयोजनासाठी प्रशालेच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका प्राजक्ता जाधव व माधवी मालगर व इतर शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले मुलांच्या या यशाबद्दल शिक्षक ,संस्थाचालक, पालक व कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!