संजय भोगटे यांचा ठाकरे सेनेला “जय महाराष्ट्र”…

जिल्हा कार्यकारिणी सदस्य संजय भोगटे यांचा राजीनामा
सर्व पदांचा राजीनामा; पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर…
कुडाळ, ठाकरे शिवसेनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय भोगटे यांनी आज पक्षाला जय महाराष्ट्र केला. आज येथे तडकाफडकी पत्रकार परिषद घेऊन आपण शिवसेनेला सोडचिट्टी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गेली ९ वर्षे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्याचा दावा केला. परंतु गेले काही दिवस घुसमट होत असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.भोगटे हे यापूर्वी राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी तत्कालीन शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला होता. सद्यस्थितीत त्यांच्याकडे शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारणी तसेच प्रवक्ते पदाची जबाबदारी होती. मात्र त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ते आता नेमकी पुढे कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.