सिंधुदुर्गच्या विकासात महिलांना सहभागी करून घेणारी जिल्हा बँकेची अबोली ऑटो रिक्षा योजना!
८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी शुभारंभ. आमदार नितेश राणे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासामध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. त्याची घोषणा मंगळवारी आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केली. जिल्ह्यात ठिकठिकाणी या योजनेतून महिला चालवीत असलेल्या पिंक ऑटो रिक्षा दिसतील व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीचा व्याजदरात अर्थसहाय्य प्रशिक्षणासह बॅच परमिट चा खर्च करणार असल्याची ही माहिती आमदार नितेश राणे यांनी या पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या नाविन्यपूर्ण योजनेची माहितीसाठी माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळशेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्याच्या विकासामध्ये व जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये पुरुषांच्या तुलनेत कमी सहभाग असल्याचेस्पष्ट झाले होते. या जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असून साडेपाच लाख आहे. अनेक व्यवसाय व रोजगारात महिलांना काम करण्याची संधी असून या इच्छुक महिलांना रोजगाराच्या व आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा बँकेने अबोली ऑटो रिक्षा योजना हाती घेतली आहे. पिंक ऑटो रिक्षा म्हणून रेल्वे स्थानके जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये अशी रिक्षा सेवा सुरू व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेने ही योजना हाती घेतली आहे. या जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळावी तसेच आता येत असलेल्या अनेक पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाबरोबरच सुरू झालेल्या विमानसेवा जिल्ह्यातील पर्यटकांचा ओघ यासाठी या विकासाला सहाय्य करणारी सेवा जिल्ह्यातील महिलांनी पुढाकार घेऊन यशस्वी करावी व या योजनेत जिल्ह्यातील महिला व तरुणीनी पुढाकार घ्यावा व या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन या निमित्ताने आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
जिल्हा बँकेने या योजनेसाठी नऊ टक्के सवलतीचा व्याजदर जाहीर केला असून एकूण किमतीच्या 85% कर्जपुरवठा जिल्हा बँक करणार आहे. उर्वरित पंधरा टक्के कर्ज पुरवठा हा पण पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच परमिट ते करणार आहेत. व पहिल्या पाच महिलांना जागतिक महिला दिनाच्या 8 मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमात पिंक रिक्षांचे वितरण लाभार्थी महिलांना होणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
महिला अधिकारी नमिता खेडेकर यांची नियुक्ती.
जिल्ह्यातील महिलांच्या या योजनेसाठी सिंधुनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील नमिता खेडेकर यांचे खास नियुक्ती करण्यात आली असून इच्छुक महिला व युवतीने या पिंक ऑटो रिक्षा अबोली योजनेसाठी नोंदणी करावी व जिल्ह्याच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे. 94 21 14 94 21 हा श्रीमती नमिता खेडेकर यांचा मोबाईल नंबर ही जाहीर करण्यात आला असून इच्छुक महिलांनी युवतीनी या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आव्हाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
प्रतिनिधी / कोकण नाऊ / सिंधुदुर्ग