वैभववाडी मध्ये आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटाला मोठा धक्का

शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश

आमदार राणेंच्या नेतृत्वावर ठेवला कार्यकर्त्यांनी विश्वास

आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेला वैभववाडी तालुक्यात जोरदार धक्का दिला आहे. हेत किंजळीचा माळ येथील  उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते सुरेश  पुतळाजी नागप यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 273 कार्यकर्ते, महिला व युवक कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी किंजळीचा माळ येथे उपस्थित राहून सर्वांना पक्ष प्रवेश देत अभिनंदन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, तालुका महिला अध्यक्ष प्राची तावडे, सरपंच आर्या कांबळे, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, उपळे माजी सरपंच देवानंद पालांडे, तिरवडे माजी सरपंच योगेश पाथरे, सांगुळवाडी माजी सरपंच प्रकाश पाटील, आकाराम नागप, अभय कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
किंजळीचा माळ येथील सुरेश आप्पा नागप हे सेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. आखवणे, भोम व नागपवाडी येथील काही धरणग्रस्तांचे शासनाने किंजळीचा माळ येथे पुनर्वसन केले. येथील नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आमदार नितेश राणे यांनी जाणून घेतल्या. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
   प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेखा नागप, बाळकृष्ण नागप, संजीवनी नागप, श्रेयस नागप, हरिचंद्र नागप, शुभांगी नागप, ओम नागप, शारदा नागप, ऋषिकेश नागप, विलास कोलते, रेवा नागप, वैशाली कोलते, संतोष कोलते, संपदा कोलते, राजाराम कोलते, शिवलिंग पडवळ, कुणाल पडवळ, अंकुश कदम, लहू कदम, शैलेंद्र पडवळ, प्रभाकर पडवळ, मानाजी घाग, मनीषा घाग, परशुराम पाटील, यशोदा पाटील, प्रकाश पडीलकर, गोपाळ सुतार, सुरेखा सुतार, पार्वती पडीलकर, दत्ताराम कदम, सविता कदम, संतोष कदम, शिवाजी पाटील, राजश्री घाग, केशव घाग, रत्नप्रभा घाग, तानाजी पाटील, स्वाती पडीलकर, परशुराम सुतार, सागर नागर, मनीषा गुरव, उमेश गुरव, हर्ष गुरव, वसंत नागप, लक्ष्मी नागप, रामचंद्र नागप, चंद्रकांत पवार, अर्पणा पवार, अविनाश पवार, अविनाश कदम, रुपेश कदम, मंगेश वळंजू, नंदकुमार वळंजू तसेच अन्य जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी व महिला पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

वैभववाडी, प्रतिनिधी

error: Content is protected !!