आरोप, बदनामी कितीही कितीही करा मतदारसंघातील जनता माझ्यासोबत!

आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

कुडाळ – मालवण मध्ये निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपाचे जोरदार काम

गेले काही दिवस माझ्या विरोधकांनी अल्पसंख्यांक लोकांकडे माझे व्हिडिओ एडिट करून दाखवले. मात्र या निवडणुकीत त्यांचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही . माझ्या विरोधात कितीही बोला, किती विरोध करा जनता माझ्यासोबतच आहे. राष्ट्रप्रेम करणारे हे अल्पसंख्यांक बांधव माझ्या कणकवली मतदारसंघात आहेत. यापूर्वी नांदगाव, उंबर्डे आणि ठाकूरवाडी यासारख्या गावांचा सरपंच भाजपच्या विचाराचा झालेला आहे.कणकवली विधानसभा क्षेत्रात विरोधकांनी खोटे नाटे आरोप करून देखील जनतेने भाजपच्या विचारांना साथ दिली आहे.१२ पैकी १० ग्रामपंचायतचे सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत.कणकवली विधानसभा मतदारसंघात १२ पैकी १० ग्रामपंचायतचे सरपंच आणि ७० सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत.बेळणे आणि रामेश्वर दोन गावांमध्ये आम्ही पराभूत झालो.या पराभवाचा अभ्यास करणार आहोत.दुसऱ्या टप्यात कणकवली विधानसभा मतदार संघात भाजपाच्या विचाराचे सरपंच जनतेने निवडून दिले असल्याचे आ.नितेश राणे यांनी सांगितले.
लोकांचा निकाल हा कामाची पोहोच पावती आहे .लोकांना महायुती मान्य आहे,केलेली विकासकामे पाहून लोकांनी आम्हाला साथ दिली. या मतदार संघात पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. माझे विरोधक चुकीचे राडे रंगवत आहेत., ते लोकांना आवडलेले नाही. माझ्या मतदारांना आवडले नाही,हे निकालातून लोकांनी लाखवलेलं आहे.आमचा आमदार आमचा लोकप्रतिनिधी आमच्या सोबत वावरतोय. ही जनता माझ्यासोबत आहे. या निवडणुकी दिसून आले आहे. होऊ द्या चर्चा या कार्यक्रमातून विरोधकांनी केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
हा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे झाल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!