सत्ता असो वा, नसो लोकांच्या सेवेत राहणे हीच कार्यकर्ता म्हणून खरी ओळख!
आमदार नितेश राणे यांच्या हस्ते समीर नलावडे मित्र मंडळ दिवाळी बाजाराचे उद्घाटन
बांबू व मातीचे आकाश कंदील ठरत आहेत लक्षवेधी
आमदार नितेश राणे यांनी केले समीर नलावडे यांचे कौतुक
समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत भरविण्यात आलेल्या दिवाळी बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार नितेश राणे यांनी सत्ता असो वा नसो कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सेवेत राहणे ही येथील स्टॉल मधील महिलांनी दिलेले प्रतिक्रिया बोलकी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार सत्ता असो वा नसो दिवाळी बाजार, मोफत थाळीच्या माध्यमातून लोकांच्या सेवेत राहण्याचे काम समीर नलावडे यांनी केल्याचे कौतुकोत्गार आमदार नितेश राणे यांनी काढले. समीर नलावडे मित्र मंडळ आयोजित दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी श्री राणे बोलत होते. या दिवाळी बाजारात तब्बल 32 स्टॉल लावण्यात आले असून कणकवली शहरातील बचत गटांनी लावलेल्या स्टॉलला विविध उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मातीच्या वस्तू, बांबू पासून बनवलेले आकाश कंदील, माती पासून बनवलेले आकर्षक आकाश कंदील यासह बचत गटांच्या माध्यमातून बनवलेल्या फराळाच्या वस्तू व अन्य अनेक वस्तूंचा या दिवाळी बाजारात समावेश आहे. कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून हा दिवाळी बाजार भरविण्यात आला आहे. या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री माजी नगरसेवक अभिजित मुसळे, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे, मेघा गांगण, माजी नगरसेवक राजश्री धुमाळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, बंडू गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, सजना सदडेकर, संजीवनी पवार, कविता राणे, माजी नगरसेवक किशोर राणे, जिल्हा व्यापारी संघाचे सदस्य राजु गवाणकर, महेश सावंत, राजन परब, अभय राणे, गीतांजली कामत, आदी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर कणकवली