विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी करा -प्रभाकर सावंत

‘मी आत्मनिर्भर’ खरेदी महोत्सवात केले आवाहन
प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांची खरेदी महोत्सवाला भेट
निलेश जोशी । कुडाळ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना हि छोट्या छोट्या कारागिरांसाठी चांगली असून त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त कारागिरांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली नोंदणी करून घ्या असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलं. नर्मदाआई संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी खरेदी महोत्सव आणि प्रदर्शनाला प्रभाकर सावंत आणि भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी शनिवारी भेट दिली त्यावेळी श्री. सावंत बोलत होते.
दि. १ ते ५ नोव्हेंबर या काळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. ५ नोव्हेंबरला या महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवाला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याबद्दल प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांनी आयोजक संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी प्रदर्शनाची पाहणी केली. उपस्थितीतांच स्वागत संध्या तेरसे यांनी केलं. यावेळी प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, सदस्य रूप शिरसाट, साधना राणे, कार्यालय मंत्री श्री. राणे उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीप्ती मोरे यांनी केलं. यावेळी प्रभाकर सावंत आणि श्वेता कोरगावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.