सांगवेतील घरफोडी प्रकरणी दोन महिला अटकेत

महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांची कारवाई

एका महिलेची यापूर्वीची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी

कणकवली तालुक्यातील सांगवे संभाजीनगर येथील वासुदेवानंद या बंगल्यात चोरी केल्याप्रकरणी अंजली गणेश कुबडे (वय 29 हरकुळ बुद्रुक) व पूजा विश्वनाथ गावडे (वय 22 वागदे) या दोघांना अटक करण्यात आली. या बंगल्यातील चोरी प्रकरणी महिला पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी या संशयित महिला आरोपींना अटक केली. याप्रकरणी 17 ऑक्टोंबर रोजी कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच हुबरट येथे झालेल्या चोरी प्रकरणातही या संशयित आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दोन्ही संशयित आरोपींना शनिवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अंजली कुबडे हीच्यावर यापूर्वी भा द वि 307 व घंटा चोरी प्रकरणातील गुन्हे दाखल असून, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता तिच्याकडून अधिक तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक वृक्षाली बर्गे यांनी दिली. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!