सरपंच उमेदवार जेरॉन फर्नांडिसप्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

फर्नांडिस आणि सर्व सदस्यांचा विजय निश्चित–भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर


आचरा–अर्जुन बापर्डेकर
: भाजप, शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस तसेच सदस्य उमेदवार यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आचरा बाजारपेठ तिठा या मार्गांवरून प्रचार फेरी काढण्यात आली. याफेरीस लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विजयाचा विश्वास द्विगुणित करुन गेला. या फेरीत भाजप शिवसेना पुरस्कृत पॅनलचे सर्व उमेदवारांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,
भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी सभापती नीलिमा सावंत, महेश मांजरेकर, राजन गांवकर, संतोष गांवकर, संतोष कोदे, राजन पांगे, प्रफुल्ल प्रभू, दीपक सुर्वे, सचिन हडकर, मंदार सरजोशी, अवधूत हळदणकर, रुपेश हडकर, बाबू कदम यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार जेरॉन फर्नांडिस यासह सदस्य उमेदवार सारिका नंदकिशोर तांडेल, प्रियता पांडुरंग वायंगणकर, मुजफ्फर बशीर मुजावर, प्राजक्ता नामदेव देसाई, सायली सचिन सारंग, योगेश गोविंद गांवकर, श्रुती श्रीपाद सावंत, चंद्रकांत धोंडू कदम, हर्षदा उदय पुजारे, महेंद्र गोविंद घाडी, पंकज वामन आचरेकर, किशोरी किशोर आचरेकर, संतोष गणपत मिराशी आदी उमेदवार रिंगणात आहेत. या फेरीनंतर भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी जेराॅन फर्नांडिस यांचा सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध,अडीअडचणीला मदतीसाठी धावून जाण्याची भावना यामुळे
ते निर्विवाद विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

error: Content is protected !!