जिल्हास्तरीय कला उत्सवात कणकवली कॉलेजचे घवघवीत यश

शास्त्रीय गायनात स्वरांगी गोगटे प्रथम तर तबला वादन स्पर्धेत संतोष सुतार प्रथम

कणकवली/मयुर ठाकूर

  माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कला उत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत शास्त्रीय गायनात कणकवली कॉलेज कनिष्ठ विभागातील  कु. स्वरांगी गोगटे प्रथम तर तबला वादन स्पर्धेमध्ये कुमार संतोष सुतार प्रथम येण्याचा मान मिळवला.                                     
         जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धा  दिनांक 26 ऑक्टोबर रोजी न्यू इंग्लिश स्कूल, कसाल तालुका- कुडाळ येथे  आयोजित करण्यात आली होती . जिल्ह्यातील एकूण 178 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या जिल्हास्तर कला उत्सवात कणकवली कॉलेज कणकवली ने घवघवीत यश संपादन केले.                                                   
      शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे,  सचिव विजय कुमार वळंजू , विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप साळुंखे, प्रभारी प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा अरुण चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख  प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा .विजय सावंत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेत्या स्पर्धकांच अभिनंदन केलं आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!