प्रत्येक निराधार वंचिताला माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळाले पाहिजे – संदिप परब , अध्यक्ष जीवन आनंद संस्था

निराधारांचे दुःख आणि अडचणी समजून घेण्यासाठी कदंबा बस स्टँडच्या फुटपाथवर झोपले संदिप परब
गोव्यातील कदंबा बस स्टँण्ड येथून तीन निराधार बांधवांना संविता आश्रमात केले दाखल
गोवा – माणूस म्हणून जन्माला आलेल्या आणि आज दारिद्र्य आणि विविध संलग्न कारणांनी रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगत असलेल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळाले पाहिजे. मानव समाज म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी केले
रस्त्यावरील निराधार वंचितांचे जीवनातील दुःख आणि अडचणी समजून घेवून त्यावर उपाय योजण्यासाठी संदिप परब हे नेहमी विविध ठिकाणच्या फुटपाथवर झोपतात. नुकतेच ते गोव्यातील कदंबा बस स्टँण्डवर झोपले होते....यावेळी कदंबा बस स्टँण्ड जवळील रस्त्यावर निराधार वंचित स्थीतीत जीवन जगत असल्याचे आढळून आलेले... १) अर्धांगवायू झालेले ७२ वर्षीय मुकबधीर आजोबा,२) अर्जुन सुर्या चारी (वयः७०), आणि धनंजय भागवत (वयः४९) या तीन व्यक्तींना त्यांनी म्हापसा पोलिस अधिकारी व आश्रमातील सहकारी प्रसाद आंगणे , ऊदय कामत व विजय नाईक यांच्या मदतीने संविता आश्रमात दाखल केले. यावेळी संदिप परब बोलत होते.
भारत देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी लढलेल्या तसेच स्वातंत्र लढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्वप्न होते.की स्वतंत्र देशात प्रत्येक नागरिकाला पोटभर अन्न, अंगभर वस्त्र आणि हक्काचा निवारा मिळेल. अशी परिस्थीती देशात निर्माण केली जाईल. मात्र आज देशात लाखोंच्या संख्येने दारिद्र्य आणि अन्य संलग्न कारणांनी लक्षावधी लोक रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगत आहेत. हे आज समाजा समोरील मोठे आवाहन आहे आणि हेच देश स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांचे स्वतंत्र देशाबद्दलचे स्वप्न देखील आहे.
किसन चौरे, कोकण नाऊ