घोडावत विद्यापीठात व्हायब्रंट 2023- 24 चे आयोजन
जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील व्हायब्रंट 2023-24 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत 3 व 4 नोव्हेंबर रोजी तंत्रज्ञानावर आधारित स्पर्धा होतील. तंत्रज्ञान स्नेही विद्यार्थ्यांना मुक्त व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य,शोध आणि कलागुणांना वाव देण्यासाठी 14 विविध प्रकारात या व्हायब्रंट अंतर्गत स्पर्धा होणार आहेत. यामध्ये कोडेस्ट्री,फोटो फ्यूजन, हॅकॅथॉन,रोबो डॅश,शार्क हंट,फार्मा क्राफ्ट,अॅडमॅनिक,ड्रोन रश, सीएडी मास्टर्स,फील द रील, पोस्टर परफेक्ट,फ्लॅश टॉक, वन पीस,बॅटलग्राउंड,शो स्टॉपर्स यांचा समावेश आहे.
तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध डीजे कलाकार डीजे ओडेन याच्या संगीतमय कार्यक्रमचे (डीजे नाईटच) आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील भविष्यकालीन बदलांचा वेध घेता यावा यासाठी ऑटो एक्सपो व प्रोजेक्ट प्रदर्शन 3 व 4 नोव्हेंबर रोजी भरवण्यात आल्याची माहिती समन्वयक डॉ.अमेय काटदरे यांनी दिली आहे.जास्तीत जास्त स्पर्धक, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन तांत्रिक कौशल्याचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी निलेश सबनीस सुरभी गायकवाड ,विद्यार्थी कल्याण मंडळाचे डीन डॉ. चेतन पाटील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक,विद्यार्थी कष्ट घेत आहेत.
अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,अकॅडमीक डीन डॉ.व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.