मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव प्रशाले मध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन
मळगांव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित, मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव या प्रशालेमध्ये रंगमंच्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशालेची रंगमंच्याची गरज ओळखून प्रशालेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक शरद बाबनी शिरोडकर यांनी रोख रक्कम एक लाख रुपये व त्यांचे बंधू सुभाष बाबनी शिरोडकर यांनी रोख पन्नास हजार रुपये त्यांच्या मातोश्री कैलासवासी श्रीमती गोपिका बाबनी शिरोडकर यांच्या स्मरणार्थ देणगी दिली या त्यांच्या दातृत्वाबद्दल संस्था, शालेय समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, ग्रामस्थ यांच्याकडून कौतुक होत आहे.
रंगमंच्याच्या भूमीचे भूमिपूजन प्राध्यापक मा. शरद बाबनी शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. फाले सर, पर्यवेक्षक श्री. कदम सर, स्कूल कमिटी चेअरमन श्री. मनोहर राऊळ, माजी सभापती राजू परब, संस्था संचालक केळुस्कर आणि बाप्पा नाटेकर, माजी विद्यार्थी संघाचे सचिव गांवकर, सुभाष नाटेकर, गुरुनाथ गांवकर, भाऊ देवळी, विनायक राऊळ, सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या त्यांच्या दातृत्वाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक फाले . पर्यवेक्षक कदम सर, मळगांव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष मा. शिवराम मळगांवकर, कार्याध्यक्ष मा. नंदकिशोर राऊळ, सचिव मा. आर. आर. राऊळ, खजिनदार मा. मोहन मुळीक, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ व सर्व पदाधिकारी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिरोडकर बंधु यांचे आभार मानले. अलीकडेच प्रा. शरद शिरोडकर यांना त्यांच्या हिंदी भाषेतील प्रबंधाबद्दल डॉक्टरेट (मुंबई विद्यापीठ ) पदवी मिळाली आहे. त्यासाठी सर्वाकडून त्यांना खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्या.
सावंतवाडी, प्रतिनिधि