विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांची कणकवली यंगस्टार मंडळाच्या तब्बल २७ व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट

कणकवली : कणकवली यंगस्टार मंडळाच्या वतीने गेले २७ वर्षे जे कार्यक्रम होत होते ते मी बघत आलो होतो. त्यावेळी एवढी मीडिया प्रगल्भ नव्हती.पण वृत्तपत्राच्या माध्यमातून हे मी वाचत आलो होतो.विद्यार्थी देशांमध्ये बघितलेले हे मंडळाचे काम प्रत्यक्षात या व्यासपीठावरून बघता आलं. याचा आनंद होत आहे. भविष्यात यंग स्टार मंडळाच्या वतीने यापेक्षाही मॅटवर भव्य दिव्य कबडडी स्पर्धेचे आयोजन पुढच्या वर्षी करा.विशाल सेवा फाऊंडेशनच्या वतीने लागणारे सर्व ती मदत मी करेन. अशी ग्वाही देत विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा आणि भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मंडळाच्या तब्बल 27 व्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेला भेट देत त्यांचे कौतुक केलं. यावेळी व्यासपीठावर भाजपची युवा नेते तथा विशाल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल परब, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे,अण्णा कोदे,यासह यंग स्टार मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांच्या हस्ते उपान्त्य सामन्याचे नाणेफेक करण्यात आले. हजारो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून विशाल परब यांची उपस्थिती होती यावेळी यंगस्टार मंडळाच्या वतीने विशाल परब यांचा शाल शिफळ देऊन भव्यदिव्य असा सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!