आचरा बंदर मारुती घाटी येथे आढळला मुंडके छाटलेला बोकड

निवडणुकीचे पडधम सुरु असताना पहिल्यांदाच असा प्रकार दिसल्याने उलट सुलट चर्चेला उधाण

आचरा मालवण रस्त्यालागतच्या मारुती घाटी फाट्यावर शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एक मुंडके छाटलेला बकरा अगदी रस्त्याच्या कडेला टाकलेला दिसून आला होता. आचरा मालवण रस्ता व मारुती घाटी रस्ता असे जेथे तीन रस्ते एकत्रित होतात अशा ठिकाणी आणून टकलेला बकरा. या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाट सुरूना हा मुंडके छाटलेला बकरा दिसून येत होता.वन्य प्राण्याने मारुन टाकला असता तर मुंडके खालेल्या अवस्थेत आढळले असते मात्र दिसून येत असलेला बकरा मुंडके कापलेल्या अवस्थेत दिसत होता. तसेच बकरा टाकलेल्या ठिकाणी कोणतेही रक्ताचे डाग नसल्याने सदर बकरा दुसऱ्या ठिकाणी मारून मग आणला असावा असा अंदाज वर्तवला जात होता. आचरा ग्रामपंचायत निवडूकीचे पडधम आचऱ्यात जोरात सुरु झाले आहेत आणि अशावेळी मुंडके छाटलेला बकरा दिसून आल्यामुळे यामागचे इप्सित काय याबाबत मात्र गावात उलट सुलट चर्चाना उत आला आहे.

आचरा, प्रतिनिधी

error: Content is protected !!