बांधकरवाडी स्पर्धेत साक्षी राणे ठरल्या पैठणीच्या मानकरी

दत्तप्रसादिक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते स्पर्धेचे आयोजन
दत्तप्रसादिक मित्रमंडळ बांधकरवाडी आयोजित पैठणी स्पर्धेत विजेते – सौ. साक्षी सुनिल राणे,द्वितीय – सौ. समृद्धी प्रफुल्ल सावंत, तृतीय – सौ. गीतांजली गोविंद राणे. कणकवली बांधकरवाडी च्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेना तालुका समन्वयक तेजस राणे यांनी पैठणी पुरस्कृत केली होती. तर द्वितीय पारितोषिक प्रतीक रासम यांनी पुरस्कृत केले होते. या बक्षीस वितरण प्रसंगी तेजस राणे, प्रतिक रासम, मारुती राणे, सुनिल राणे, विष्णू राणे, नामदेव चव्हाण, मनोज राणे, सुमित राणे, प्रविण सावंत, दादु राणे, विशाल साटम, रामदास ठाकूर, संजय राणे, राजु राणे, रवि म्हडेश्वर,रजत राणे, सर्व बांधकरवाडी मित्रमंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले.
कणकवली, प्रतिनिधी