खासदार विनायक राऊत यांचा शिवसेना ठाकरे गट कनेडी विभागाच्या वतीने सत्कार

शिवसेना नेते पदी झाली आहे निवड
खासदार विनयक राऊत यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना नाटळ हरकुळ विभाग शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य शिवसेना शाखा कनेडी च्या वतीने करण्यात आले होते.
शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांनी विभागाच्या वतीने तसेच शिवसेना शाखा कानेडी नवरात्र उत्सव मंडळ च्या वतीने खा विनायक राऊत यांचा शिवसेना नेते पदी वर्णी लागल्याबद्दल शाल श्रीफळ देवून सत्कार केला.
यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत , युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके , युवासेन उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत , सचिन सावंत , रामू विखाळे , राजू पावसकर , हेमंत सावंत , सौ अंजली सापले, सौ अरुणा सावंत, नवरात्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाळके, तुषार गावकर, शिवप्रसाद पेंढुरकर, कुणाल सावंत, संदीप गावकर , कमलेश नारकर, राजू डोंगरे, मंगेश सावंत, अभिषण सावंत , सुदर्शन रसम , प्रकाश सावंत , मुन्ना तेली, संदेश गुरव, प्रसाद मिस्त्री, जया सावंत , प्रकाश गावकर, आदी उपस्थित होते.
कणकवली, प्रतिनिधी