आयडियल प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/ मयूर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स या प्रशालेत शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.संपूर्ण भारतभरात हा उत्सव थाटात साजरा केला जातो. विद्येची आराध्यदैवत असलेल्या सरस्वती मातेची पूजा-अर्चा यावेळी केली जाते.याचप्रमाणे आयडियल प्रशालेमध्ये देखील सरस्वती पूजन केलं गेल.यावेळी सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तिची विधिवत पूजा केली गेली.तसेच सरस्वती मातेची आराधना देखील करण्यात आली.यावेळी सरस्वती च्या मूर्तीची आरास सजवण्यात आली होती.प्रशालेतील मुलांनी विविध प्रकारची भजन म्हणत नामस्मरण देखील केले.सरस्वती मातेची पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली. सर्व मुलांनी या कार्यक्रमांमध्ये अतिशय उत्साहात सहभाग घेतला. सरस्वती मातेचे दर्शन घेऊन तिच्या चरणी फळ-फुलं मुलांनी अर्पण केली. सरस्वती पूजनाबरोबरच आयडियल प्रशालेत नवरात्रोत्सव देखील साजरा करण्यात आला.प्रशालेच्या मुलांनी दांडिया खेळत हा सण साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, तसेच ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल,सल्लागार तानवडे सर,मुख्याध्यापिका अर्चना देसाई मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!