विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव उत्साहात साजरा

कणकवली/मयुर ठाकूर
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत शारदोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला . शारदा देवीची मूर्ती मिरवणुकीने वाजत गाजत आणली त्यावेळी इंग्लिश माध्याम शाळेने लेझिम व वारकरी नृत्य सादर केली ढोल तासांच्या गजरात शारदे मातेचे आगमन झाले . मंत्रोच्चाराने सरस्वती मातेची पूजा करण्यात आली यावेळी प्रथमच नारीशक्तीला पूजेचा मान देण्यात आला प्रशालेच्या जेष्ठ शिक्षिका सौ कुबल मॅडम यांनी पुजेचा मान स्वीकारून शारदा मानेची मनोभावे पूजा केली . आरती आणि भजन सादर करून प्रसादाचा आस्वाद विद्यार्थांनी घेतला . याप्रसंगी विद्यार्थांनी नृत्याचा आविष्कार सादर करून आनंद लुटला . इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थांनी शारदे मातेची मनोभावे पुजा पाठ करून भक्तीच्या प्रवाहात एकरूप झाले . प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाने नेटके नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला . शारदोत्सव कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. साळुंखे मॅडम सचिव श्री वळजूं साहेब . श्री . डेगवेकर साहेब माजी मुख्याध्यापक श्री . आर . व्ही सावंत . श्री तानवडे सर उपस्थित होते . प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे पर्यवेक्षक सौ जाधव सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संखेने उपस्थित होते .