कणकवली परबवाडी बीएसएनएल टॉवर अखेर चार दिवसांनी सुरू!

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी वेधले होते बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांचे लक्ष

आक्रमक भूमिका घेताच बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग

कणकवली शहरामधील रेल्वे स्टेशन नजीक परबवाडी मध्ये असलेला बीएसएनएल चा मोबाईल टॉवर गेले चार दिवस बंद असल्याने जवळपास 25 टक्के कणकवलीतील मोबाईल ची रेंज गायब झाली होती. त्यामुळे गेले चार दिवस मोबाईल धारकांचे प्रचंड हाल झाले होते. दरम्यान याबाबत कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांची लक्ष वेधले या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. हे काम तात्काळ करा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला. त्यानंतर आज दुपारी तातडीने बीएसएनएल च्या अधिकाऱ्यांनी या टॉवरच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. त्यावेळी मोबाईल टॉवरची फायबर केबल खराब झाली असल्याची बाब निदर्शनास आली. व अखेर चार दिवसांनी हा दोष निवारण करण्यात आला. त्यानंतर आज दुपारी 4 दिवसांनी हा टॉवर सुरू करण्यात आला. यामुळे कणकवली शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

error: Content is protected !!